Video: तेजश्री प्रधान करतेय हिमाचल प्रदेशची सफर; सोबतीला आहे खास मैत्रीण, पाहा व्हिडीओ
काही महिन्यांपूर्वी तेजश्री प्रधानने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ला रामराम केला. तेव्हापासून तेजश्री ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर काही दिवसांनी तिने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या आश्रमातील तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तेजश्री हिमाचल प्रदेशची सफर करत आहे. याचे फोटो, व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.