“कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून…”, विशाखा सुभेदारची पतीसाठी खास पोस्ट; म्हणाली…
अभिनेत्री विशाखा सुभेदारने सुरुवातीला आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. ‘फूबाईफू’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून विशाखा घराघरात पोहोचली. मग विशाखा मालिका, चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना दिसली. सध्या तिची ‘शुभविवाह’ मालिकेतील खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकतीच विशाखा सुभेदारने पती महेश सुभेदार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.