“मालिकाविश्वातून मी स्वेच्छा निवृत्ती घेतली”, गार्गी फुल-थत्तेंची माहिती
निळू फुलेंची मुलगी गार्गी फुले-थत्ते ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेतून घराघरात पोहोचल्या. या मालिकेतील त्यांनी साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर गार्गी ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या लोकप्रिय मालिकांमध्ये पाहायला मिळाल्या. शिवाय त्या हिंदी मालिकांमध्ये झळकल्या. पण आता त्यांनी मराठी मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याचं समोर आलं आहे.