‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, तेजश्री प्रधानने दिल्या शुभेच्छा
गेल्या वर्षा अखेरीस ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळे लग्नबंधनात अडकला. नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात राजस सुळेचं लग्न झालं होतं. त्यानंतर दोन महिन्यांनी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील आणखीन एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. तेजश्री प्रधानने अभिनेत्याचा लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.