तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकरच्या मैत्रीत दुरावा, एकमेकींना केलं अनफॉलो अन्…
'प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळेने घेतली आहे. स्वरदा आता मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनी म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने स्वरदासाठी खास पोस्ट शेअर केली होती. शिवाय यानिमित्ताने दोघी सेलिब्रेशनदेखील करताना दिसल्या. पण दुसऱ्या बाजूला तेजश्री आणि अपूर्वाच्या मैत्रीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेजश्रीचं मालिका सोडण्यामागचं कनेक्शन अपूर्वाशी असल्याचं म्हटलं जात आहे.