तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला बसला मोठा फटका
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेला रामराम केला. त्यामुळे आता मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री ऐवजी अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. पण, तेजश्रीच्या एक्झिटचा मोठा परिणाम मालिकेवर झाल्याचं समोर आलं आहे. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा टीआरपी मोठ्या प्रमाणात घसरला आहे.