‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याला लागली हळद, फोटो आले समोर
मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर साडे चार वर्ष अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांच्या यादीत या मालिकेचं नाव सामील होतं. अभिनेत्री रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा अतुल, विदिशा म्हसकर, अभिज्ञा भावे असे अनेक तगडे कलाकार मंडळी झळकलेल्या ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यामुळे अजूनही या मालिकेची चर्चा असते. याच मालिकेतील अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.