मालिकेचं शूटिंग करून हॉटेलमध्ये झोपले अन्…, मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे निधन
टीव्ही इंडस्ट्रीतून दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी व हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते योगेश महाजन यांचे ५० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उमरगावमध्ये 'शिव शक्ती' मालिकेचं शूटिंग करत असताना त्यांना अस्वस्थ वाटल्याने डॉक्टरांकडे गेले, पण हॉटेलमध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहते व कुटुंबीय शोकाकुल आहेत.