दीपिका कक्करला पहिल्या लग्नापासून आहे मुलगी? शोएबशी लग्न करण्यासाठी तिला सोडलं? म्हणाली…
'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमशी आतंरधर्मीय लग्न केलं आणि त्यांना एक मुलगा आहे. पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी असल्याचा आरोप दीपिकाने फेटाळला आहे. दीपिकाने तिच्या सासूचे आणि शोएबचे कौतुक केले. दीपिकाचे पहिलं लग्न रौनक सॅमसनशी झालं होतं, पण मतभेदांमुळे २०१५ मध्ये घटस्फोट झाला. २०१८ मध्ये तिने शोएबशी लग्न केलं आणि २०२३ मध्ये रुहानचा जन्म झाला.