“दारूच्या व्यसनाने त्याला संपवलं,” मराठमोळ्या अभिनेत्रीचं एक्स पतीबद्दल वक्तव्य
'भाभी जी घर पर हैं' फेम मराठमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे हिच्या माजी पती पियुष पुरे यांचे निधन झाले. घटस्फोटानंतर अवघ्या अडीच महिन्यांनी पियुषचे निधन झाले. शुभांगीने पियुषच्या व्यसनामुळे त्याच्याशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पियुषच्या निधनानंतर शुभांगीवर टीका झाली, परंतु तिने स्पष्ट केले की तिने पियुषला सोडण्याचा निर्णय मुलीच्या भल्यासाठी घेतला होता. व्यसनाचे गंभीर परिणाम समजून घेण्याचे आवाहन तिने केले.