‘देवमाणूस ३’नंतर श्वेता शिंदेने आणखी एका नव्या मालिकेची केली घोषणा, पाहा पहिली झलक
सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत किरण गायकवाडने साकारलेला डॉ. अजितकुमार देव ( देवीसिंग ) खूप गाजला. स्वतःच्या फायद्यासाठी गावातल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा असा हा देवीसिंग पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘देवमाणूस ३’ मालिका लवकरच सुरू होणार आहे. अभिनेत्री श्वेता शिंदे या मालिकेची निर्मितीची धुरा सांभाळणार आहे. अशातच श्वेताने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे.