रिअॅलिटी शोमध्ये पडले प्रेमात, तीन वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याने केली ब्रेकअपची घोषणा
रिअॅलिटी शो स्प्लिट्सव्हिला १३ मधील लोकप्रिय जोडी पलक यादव आणि निखिल मलिक यांनी ब्रेकअपची घोषणा केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. निखिलने लिहिलं की, "आम्ही एकमेकांबद्दल आदर ठेवून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे." पलकनेही सांगितलं की, "आम्ही बेस्ट फ्रेंड्स राहू." २०२१ मध्ये शोमध्ये भेटलेल्या या जोडीनं तीन वर्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.