Video: ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रमात नायिका व खलनायिकांमध्ये झालं भांडण!
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ या कार्यक्रमात दोन टीममधील सांगीतिक लढत पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. सिद्धार्थ जाधवने या कार्यक्रमाचं जबरदस्त सूत्रसंचालन करून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. या आठवड्यात ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ कार्यक्रमात होळी विशेष भाग असणार आहे. याचे प्रोमो नुकतेच समोर आले आहेत. यामधील एका प्रोमोमध्ये नायिका व खलनायिकांमध्ये भांडण झालेलं पाहायला मिळत आहे. पण, नायिका व खलनायिकांमध्ये कशामुळे भांडण झालं? जाणून घ्या…