ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप
'स्टार प्रवाह'वरील 'आई कुठे काय करते' मालिका डिसेंबर २०१९मध्ये सुरू झाली होती आणि आता ती लवकरच संपणार आहे. मालिकेने साडे चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मालिकेच्या बंद होण्याच्या चर्चा होत्या, आणि आता हे निश्चित झालं आहे. मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे मालिकेचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं आहे.