Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेने गाठला ५०० भागांचा टप्पा, कलाकारांनी ‘असं’ केलं सेलिब्रेशन
'स्टार प्रवाह'वरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका ४ सप्टेंबर २०२३पासून सुरू झाली. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. आज 'प्रेमाची गोष्ट' मालिकेने ५०० भागांचा यशस्वीरित्या टप्पा गाठला. यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. यासाठी खास लाल फुग्यांचं, फुलांचं डेकोरेशन करण्यात केलं होतं. मुक्ता, सागर, सावनी, सई, मिहिर, कोमल असे सर्वजण या सेलिब्रेशनमध्ये पाहायला मिळाले.