‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली एक मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या मालिकेतील ‘स्टार प्रवाह’चे बरेच जुने कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारी ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘उदे गं अंबे’. कोठारे प्रॉडक्शनची निर्मिती असलेली ‘उदे गं अंबे’ ही पौराणिक मालिका ११ ऑक्टोबर २०२४पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि इतिहास या मालिकेतून मांडण्यात आला आहे.