Bigg Boss Marathiचा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या…
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. ७० दिवसांच्या प्रवासानंतर त्याने ट्रॉफी जिंकली. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीकर सूरजसाठी खास पोस्ट केली आहे. त्यांनी सूरजच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.