तुझं अरबाजवर प्रेम आहे का? सूरज चव्हाणच्या प्रश्नावर निक्की म्हणाली, “तो मला…”
बिग बॉस मराठी ५ मध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची जवळीक चर्चेत होती. अरबाज घराबाहेर गेल्यावर निक्की खूप रडली. फॅमिली वीकमध्ये निक्कीच्या आईने अरबाजबद्दल काही गोष्टी सांगितल्यावर निक्की भडकली. आता सूरजने निक्कीला सल्ला दिला की तिने डोक्यातील विचार बाहेर काढावेत. तसेच त्याने निक्कीला अरबाजवर प्रेम आहे का? असं विचारलं. तिने तो आवडायचा असं उत्तर दिलं.