“काही वेळेला बाहेर पडणं…”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्रीची पहिली पोस्ट
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताट मोठा निर्णय घेतला. सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असलेली मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधून बाहेर पडण्याचा निर्णय तेजश्रीने घेतला आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसह मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. सर्वजण नाराजी व्यक्त करत आहे. अशातच तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तेजश्रीची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल झाली आहे.