तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांबरोबर ग्रेट भेट, पाहा फोटो
मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमी चर्चेत असते. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच तिची कोणतीही भूमिका असो ती सुपरहिट ठरतेच. काही महिन्यांपूर्वी तेजश्रीने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. नुकतीच तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकारांबरोबर ग्रेट भेट झाली.