तेजश्रीचं ‘होणार सून…’ मालिकेतील आईबरोबर अजूनही आहे घट्ट नातं, फोटो शेअर करत म्हणाली…
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ ही गाजलेल्या मालिकांपैकी एक अशी मालिका. या मालिकेनं अडीच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. शशांक केतकर, तेजश्री प्रधान, रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठारे, लीना भागवत अशी तगडी कलाकार मंडळी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत पाहायला मिळाली. ही मालिका अनेक जण आजही तितक्याच आवडीनं पाहतात. या मालिकेत झळकलेल्या मायलेकी जान्हवी व शशिकला यांचं नातं अजूनही तसंच घट्ट आहे. तेजश्री प्रधाननं नुकतीच शशिकला म्हणजेच अभिनेत्री आशा शेलार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.