Video: तेजश्री प्रधानने हिमाचल प्रदेशच्या ट्रीपचा पहिला Reel व्हिडीओ केला शेअर, म्हणाली…
‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मराठी सिने आणि मालिकाविश्वातील ती आघाडीची अभिनेत्री आहे. तेजश्रीची कोणतीही भूमिका असो प्रेक्षक ती डोक्यावर घेतात. सध्या तेजश्री ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यापासून ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे. नुकतीच ती हिमाचल प्रदेशला फिरायला गेली होती. याचा पहिला रील व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.