‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान ‘या’ आश्रमात घालवतेय दिवस, पाहा फोटो
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तेजश्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. पण काही दिवसांपूर्वी तेजश्रीने चाहत्यांना धक्का बसणारा निर्णय घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मधून तिने एक्झिट घेतली. मात्र, मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान सध्या काय करते? हे तुम्हाला माहितीये का?