Nitin chauhan death reason
1 / 31

काम मिळत नसल्याने अभिनेत्याने संपवलं आयुष्य, पत्नी घरी नसताना केली आत्महत्या

टीव्ही अभिनेता नितीन चौहान उर्फ नितीन सिंहने आत्महत्या केली आहे. तो ३५ वर्षांचा होता आणि त्याला पत्नी व एक मुलगी आहे. नितीनने मुंबईतील गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतला. काम मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले असता नितीन मृत अवस्थेत आढळला. नितीनने 'दादागिरी सीझन २', 'स्प्लिट्सविला' आणि 'क्राइम पेट्रोल'सारख्या शोमध्ये काम केले होते.

Swipe up for next shorts
actor himansh kohli wedding photos out
2 / 31

बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं लग्न, फोटो आले समोर

'यारियां' फेम प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहलीने लग्न केलं आहे. हिमांशने नवी दिल्लीतील एका मंदिरात साधेपणाने विनीशी लग्न केलं. ३५ वर्षांच्या हिमांशने अरेंज मॅरेज केलं असून, लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. हिमांशच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हिमांशचं फिल्मी करिअर फारसं यशस्वी राहिलं नाही.

Swipe up for next shorts
collector bro kerala ias officer n prashantha suspended
3 / 31

‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर आगपाखड केल्यावरून कारवाई!

केरळ सरकारने दोन आयएएस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारणावरून निलंबनाची कारवाई केली आहे. उद्योग व व्यापार मंडळाचे संचालक के. गोपालकृष्णन यांनी 'मल्लू हिंदू ऑफिसर्स' नावाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केल्यामुळे आणि कृषीविकास विभागाचे विशेष सचिव एन. प्रशांत यांनी वरिष्ठांवर जाहीररीत्या आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. प्रशांत यांच्या कार्यकाळात महत्त्वाच्या फाईल्स गहाळ झाल्याचाही आरोप आहे.

Swipe up for next shorts
Uddhav Thackeray on CM Post
4 / 31

“माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पद घुसलंय…”, मविआतील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!

राज्यात निवडणुकीची रंगत वाढत असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप स्पष्ट नाही. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांना मुख्यमंत्री केलं तरी हरकत नाही. तसेच, मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही चर्चा करू, पण महाराष्ट्राचे लुटारू मुख्यमंत्री नकोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
5 / 31

तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता?

धकाधकीच्या दिवसानंतर घरी परतताच लगेच पलंगावर आपलं थकलेलं शरीर टाकावं आणि सुखद अनुभव घ्यावा हे नेहमीच सगळ्यांना वाटत असतं. पण, जेव्हा बेडशीट नुकतीच फ्रेश घातलेली असते तेव्हा त्याच्या सुगंधामुळे तुम्हाला गाढ झोप लागते. परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खूप काम असल्याने तुमची बेडशीट बदलायची राहूनच जाते. पण, तुम्हाला हा एक प्रश्न नक्कीच मनात येत असेल की, लोकांनी त्यांच्या बेडशीट किती वेळा धुवाव्यात?

celebrated Diwali in America for the first time watch video
6 / 31

भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे भाऊ कदम. गेल्या कित्येक वर्षांपासून भाऊ कदम प्रेक्षकांना त्यांचं टेन्शन विसरायला लावून मनसोक्त हसवण्याचं काम करत आहेत. अशा या लोकप्रिय विनोदवीरांची लेक सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. काही महिन्यापूर्वी भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम अमेरिकेत शिक्षणासाठी गेली. तेव्हापासून ती अमेरिकेतील व्लॉग सोशल मीडियावर शेअर करत असते.

Uddhav Thackeray on Pranpratishtha
7 / 31

“राम मंदिर गळनेका थांबेगा तो…”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे एकच हशा!

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर टीका केली आहे. त्यांनी नरेंद्र मोदींवर मिश्किल टिप्पणी करत, "मंदिर गळतंय, ते थांबल्यावर मी जाईन," असं म्हटलं. ठाकरे उमरगा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ बोलत होते. त्यांनी शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरही टीका केली आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला. ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि नंतरही त्यांनी राम मंदिराला भेट दिली होती.

actor amit tandon cheated wife ruby tandon
8 / 31

अनेक अफेअर, ठरवून पत्नीची फसवणूक अन्..; अभिनेत्याचे स्वतःबद्दल धक्कादायक खुलासे

लोकप्रिय टीव्ही अभिनेता व गायक अमित टंडन याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 'इंडियन आयडल १'मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या अमितने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. त्याने पत्नीची अनेकवेळा फसवणूक केल्याची कबुली दिली. २०१७ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा तिच्याशीच लग्न केलं. अमित व रुबी यांना एक मुलगी आहे.

Ajit pawar on NCP BJP Alliance
9 / 31

“राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी भाजपाबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, परंतु हे सरकार अल्पावधीत कोसळलं. अजित पवारांनी खुलासा केला की, शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हा शपथविधी झाला होता. या युतीसाठी दिल्लीत गौतम अदाणी यांच्या घरात बैठक झाली होती. अजित पवारांनी सांगितलं की, शरद पवारांच्या मनात काय आहे, हे कोणालाच ओळखता येणार नाही.

Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
10 / 31

पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी

अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खाननंतर ज्येष्ठ अभिनेते व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून धमकी आली आहे. मिथुन यांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागावी, अशी मागणी भट्टीने केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भट्टीने मिथुन यांना १०-१५ दिवसांत माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.

Bigg boss 18 karan veer Mehra chum darang shrutika arjun rajat dalal seven contestants nominated
11 / 31

Bigg Boss 18: सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया ‘अशी’ पार पडली, सात सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 18: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चं यंदा १८वं पर्व सुरू आहे. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता सहावा आठवडा आहे. नुकतीच सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. नेहमी प्रमाणे याही नॉमिनेशन प्रक्रियेत वाद पाहायला मिळाले. एकूण सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
12 / 31

Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, रामभद्राचार्यांचं विधान

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानाची चर्चा आहे. मुंबईतील 'संविधान बचाव संमेलन' कार्यक्रमात खर्गेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत भगवे कपडे परिधान करण्यावर टीका केली. यावर जगदगुरू रामभद्राचार्यांनी प्रत्युत्तर देत भगवाधारींनी राजकारणात यावे, असे मत व्यक्त केले. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या 'कटेंगे तो बटेंगे' घोषणेचं समर्थनही केलं.

Amit Thackeray on Sada
13 / 31

प्रचारादरम्यान सदा सरवणकरांना महिलांनी जाब विचारला; अमित ठाकरे म्हणाले, “मी तिकडे…”

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम कोळीवाड्यात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर यांना महिलांनी प्रश्न विचारत धारेवर धरले. महिलांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनेवर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत स्टॉल्स महिलांच्या रोजगारासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समाधान सरवणकरांनी महिलांवर दारू विक्रीचा आरोप केला, तर अमित ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले.

Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
14 / 31

Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…

दमदार अभिनयाबरोबरच आपल्या लेखणीने अन् दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे प्रवीण तरडे. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, असे दर्जेदार चित्रपट त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. तसंच मराठीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रवीण तरडेंनी आपली छाप उमटवली आहे. अशा या हरहुन्नरी कलावंताचा सोमवारी ( ११ नोव्हेंबर ) ५०वा वाढदिवस होता. यानिमित्ताने अभिनेता कुशल बद्रिकेने खास ५० कविता लिहिल्या आहेत. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
15 / 31

‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्री म्हणालेली, “मी अभिषेक बच्चनशी…”

मागील काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे. दोघे वेगळे राहतात अशी अफवा आहे, परंतु बच्चन कुटुंबाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. ऐश्वर्याच्या जुन्या मुलाखतीत तिने 'ऐश्वर्या राय बच्चन' या नावावर आश्चर्य व्यक्त केले होते. ऐश्वर्या व अभिषेकची भेट २००२ मध्ये झाली आणि २००७ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना २०११ मध्ये मुलगी झाली, जी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते.

dsp meets vegetable vendor friend in bhopal
16 / 31

१४ वर्षांनी DSP नी भाजीवाल्या मित्राला शोधून काढलं, गाडीतून उतरले..गळाभेट घेतली; भावनिक..

मध्य प्रदेशातील डीएसपी संतोष पटेल यांनी १४ वर्षांपूर्वीच्या भाजीवाल्या मित्र सलमान खानला शोधून त्याची गळाभेट घेतली. भोपाळमध्ये शिक्षण घेत असताना सलमानने पटेलला मोफत भाजी देऊन मदत केली होती. या भावनिक भेटीचा व्हिडीओ पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केला. सलमाननेही या आठवणींना उजाळा देत पटेलच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.

Lakhat Ek Amcha Dada Marathi Serial Tulja Propose to surya watch new promo
17 / 31

Video: तुळजाने सूर्यादादाला केलं प्रपोज, पाहा ‘लाखात एक आमचा दादा’चा जबरदस्त प्रोमो

Lakhat Ek Amcha Dada Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये आता प्रेमाचे रंग पाहायला मिळणार आहेत. बालपणापासून सूर्या ज्या मुलीवर जीवापाड प्रेम करत होता ती तुळजा आता सूर्याच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे सूर्या आणि तुळजाच्या नात्याला आता नवीन वळण आलं आहे. अशातच तुळजाने सूर्याला नदीकाठी खास सरप्राइज देऊन प्रपोज केलं आहे. याचा सुंदर प्रोमो नुकताच समोर आला आहे.

Stree 2 box office collection
18 / 31

‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

२०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट 'कल्की 2898 एडी' आहे. प्रभास, अमिताभ बच्चन व दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने २७ जून रोजी प्रदर्शित होऊन बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. ५५० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 'कल्की 2898 एडी' नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Raosaheb Danave Beating Karyakarta
19 / 31

फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवेंनी लाथाडलं; VIDEO व्हायरल!

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी अर्जुन खोतकर यांच्या सन्मानाच्या वेळी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचे दिसते. या घटनेवरून शरद पवार आणि संजय राऊत यांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी सर्वांनी आदर ठेवावा असे म्हटले आहे. दानवे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जनसंपर्क सुरू केला असून, भोकरदन मतदारसंघात त्यांच्या पुत्राची निवडणूक आहे.

Navjot Singh Sidhu returns to Kapil Sharma Show
20 / 31

तब्बल ५ वर्षांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची कपिल शर्माच्या शोमध्ये पुन्हा एन्ट्री

'द कपिल शर्मा शो'मध्ये पाच वर्षांनंतर नवजोत सिंग सिद्धू यांची पुन्हा एन्ट्री झाली आहे. त्यांच्या आगमनाने सेटवर हशा पसरला आहे. शोच्या टीझर व्हिडीओमध्ये सिद्धू अर्चनाच्या खुर्चीवर बसलेले दिसतात, ज्यामुळे सर्वजण खळखळून हसतात. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू आणि क्रिकेटर हरभजन सिंहही शोमध्ये आले आहेत. सिद्धू पुन्हा शोचा भाग होणार की नाही, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

Highest Paid Indian Singer AR Rahman
21 / 31

भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत

भारतीय संगीत विश्वात अनेक गाणी तयार होतात, काही लक्षात राहतात तर काही विसरली जातात. सध्या भारतात एआर रेहमान सर्वाधिक मानधन घेणारे गायक आहेत, ते एका गाण्यासाठी तीन कोटी रुपये घेतात. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अरिजीत सिंह आणि सोनू निगम हे इतर आघाडीचे गायक आहेत. रेहमान यांची संपत्ती १७०० कोटींहून जास्त असून ते लाइव्ह कॉन्सर्टसाठी तासाला ३ ते ५ कोटी रुपये घेतात.

What Prakash Ambedkar Said?
22 / 31

राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, म्हणाले, “ते आपल्याला..”

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला होणार असून निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. त्यांनी भारतीय संविधानाच्या रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली. तसंच मुस्लिम बांधवांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Pranav Mohanlal is working on a farm in Spain for food
23 / 31

वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता मात्र लोकांच्या शेतात काम करतोय अभिनेता

मल्याळम सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांचा मुलगा प्रणव मोहनलाल सध्या स्पेनमध्ये लोकांच्या शेतात अन्न व निवाऱ्याच्या बदल्यात काम करतोय. त्याच्या आई सुचित्रा यांनी ही माहिती दिली. प्रणवला अभिनयात रस असून तो चित्रपट व भूमिका विचारपूर्वक निवडतो. त्याने २०१८ मध्ये 'आधी' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. 'हृदयम' चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

Krish Jagarlamudi married to Hyderabad doctor
24 / 31

Video:प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ

प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक क्रिश जगरलामुडीने ११ नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रिती चल्लाशी साधेपणाने दुसरं लग्न केलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून, अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिशचं पहिलं लग्न २०१६ मध्ये राम्या वेलागाशी झालं होतं, पण २०१८ मध्ये घटस्फोट झाला. क्रिशने 'मणिकर्णिका', 'गब्बर इज बॅक' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

ajit-pawar on sharad pawar
25 / 31

“ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका

अजित पवार यांनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी तरुण उमेदवारांना संधी देण्याची गरज व्यक्त केली होती. अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीवर प्रश्न उपस्थित केला आणि ८५ वर्षांपर्यंत काम करण्याचा न्याय विचारला. त्यांनी महायुतीतील मतभेदांवरही भाष्य केले. तसेच, प्रतिभा काकींच्या प्रचारावरून शंका उपस्थित केली आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे महत्त्व सांगितले.

Ajit Pawar on pratibha pawar
26 / 31

“प्रतिभाकाकी मला आईसमान, पण मला पाडण्याकरता घरोघरी जाऊन प्रचार?” अजित पवारांचा सवाल

राज्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्या लढत रंगली आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि प्रतिभा पवार प्रचारात उतरले आहेत. अजित पवारांनी प्रतिभा पवारांच्या प्रचारावर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, प्रतिभा पवार ४० वर्षांपासून प्रचार करत नव्हत्या, परंतु आता त्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. अजित पवारांनी शरद पवारांच्या दुजाभावावरही प्रश्न उपस्थित केला आहे.

maharashtra election 2024 mahim vidhan sabha sada sarvankar viral video
27 / 31

VIDEO : “लाडकी बहीण सांगता मग…”, सदा सरवणकर दारात येताच कोळी महिलेचा संताप

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवार गल्लोगल्ली लोकांच्या दारात जाऊन आपला प्रचार करत फिरत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र प्रचारादरम्यान माहीम विधानसभेचे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना तीव्र रोषाचा सामना करावा लागला. सरवणकर माहीम कोळीवाड्यात प्रचार करत असताना एका कोळी महिलेने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आपला संताप व्यक्त केला.

maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
28 / 31

अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रसाद खांडेकर नेहमी चर्चेत असतो. प्रसाद सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याव्यतिरिक्त आपली परखड मत मांडत असतो. नुकताच प्रसाद नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विदेशात गेला आहे. याचे फोटो प्रसादने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

blast at IOC plant gujarat
29 / 31

गुजरात: IOC रिफायनरीत ब्लास्ट; दोन दशकांपूर्वीच्या भीषण दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या!

देश-विदेश November 11, 2024

गुजरातच्या वडोदरामधील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत आज दुपारी ३:५० वाजता मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर रिफायनरीत आग लागली, परंतु कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं वृत्त नाही. स्फोट स्टोरेज टँकमध्ये झाला असून, अग्निशमन विभागाने तातडीने १० बंब पाठवले. या घटनेमुळे २००५ साली झालेल्या मोठ्या स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. इंडियन ऑइलने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

syntel founder Bharat Desai Success Story from leaving ratan tata company to start his own business which he sold for crores
30 / 31

व्यवसाय सुरू करण्यासाठी सोडली रतन टाटांची कंपनी, भरत देसाई यांचा प्रेरणादायी प्रवास

करिअर November 11, 2024

आयआयटी पदवीधर त्यांच्या तीक्ष्ण बुद्धी, दृष्टी आणि नाविन्यपूर्ण विचारांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांद्वारे अनेकांची नियुक्ती केली जाते, तर काही त्यांचे स्वतःचे यशस्वी उपक्रम सुरू करतात. अशाच एका IIT माजी विद्यार्थ्याला सुरुवातीला रतन टाटा यांच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने नियुक्त केले होते, परंतु अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आणि अखेरीस ती रु. २८,००० कोटींना विकली.

Anupam Kher still lives in rented house
31 / 31

“कोणासाठी घ्यायचं?” ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात

बॉलीवूड November 11, 2024

बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर मागील ४० वर्षांपासून सक्रिय असून त्यांनी ५०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. कोट्यवधी रुपये मानधन घेणारे अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी स्वतःचं घर न घेण्याचं ठरवलं आहे. मात्र, आईसाठी शिमल्यात आठ बेडरूमचं घर घेतलं. त्यांच्या पत्नी किरण खेर यांचं चंदीगडमध्ये स्वतःचं घर आहे. अनुपम खेर यांचा 'विजय 69' चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.