‘बालवीर’ फेम २४ वर्षीय अभिनेत्याने उरकला साखरपुडा, नेपाळमधील मंदिरातून शेअर केला फोटो
मालिकाविश्वात लगीनघाई सुरू असून, 'बालवीर' मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता देव जोशी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने गर्लफ्रेंड आरतीसोबत साखरपुडा केल्याची बातमी फोटो शेअर करून दिली. देवने गणरायाच्या मूर्तीसमोर व नेपाळमधील कामाख्या मंदिरात फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. देवने बाल कलाकार म्हणून 'महिमा शनि देव की' मधून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.