‘उंच माझा झोका’ मालिकेला १३ वर्षे पूर्ण! छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्रीने लिहिली खास पोस्ट
रमाबाई रानडे यांच्या आयुष्यावर आधारित असलेली ‘उंच माझा झोका’ मालिका चांगलीच गाजली होती. ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत कायमची छाप उमटवली. अजूनही ही मालिका तितक्याच आवडीने ऑनलाइन पाहिली जाते. तसंच ‘उंच माझा झोका’ मालिकेचं शीर्षकगीत बऱ्याच जणांच्या मोबाइलची रिंगटोन आहे. अशा या लोकप्रिय मालिकेला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मालिकेतील छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्री वालावलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.