‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला एक वर्ष झालं पूर्ण! वल्लरी विराज खास क्षण शेअर करत म्हणाली…
गेल्यावर्षी १८ मार्चपासून ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका सुरू झाली. बऱ्याच वर्षांनी या मालिकेच्या माध्यमातून राकेश बापटने मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस या मालिकेचा प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. आज ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने लीला म्हणजेच वल्लरी विराजने खास पोस्ट लिहिली आहे.