Bigg Boss 18: ‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाचं बदललं रुप, श्रुतिका अर्जुनशी झाले वाद
Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातला दुसरा कॅप्टन म्हणजेच ‘टाइम गॉड’ विवियन डिसेना झाला आहे. यासाठी ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला होता. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेनामध्ये या दोघांमध्ये टास्क रंगला. यावेळी घरातील सर्व सदस्यांच्या सहमतीने विवियन डिसेनाला ‘टाइम गॉड’ करण्यात आलं. पण, ‘टाइम गॉड’ होताना विवियन डिसेनाचं रुप बदलेलं दिसत आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे; ज्यामध्ये विवियन श्रुतिका अर्जुनला साफसफाई नीट न केल्यामुळे टोकताना दिसत आहे.