“त्याने माझे डोकं दारावर…”, राहुल महाजनवर एक्स गर्लफ्रेंडने केलेले गंभीर आरोप
अभिनेत्री पायल रोहतगीने जुलै २०२२ मध्ये कुस्तीपटू संग्राम सिंहशी लग्न केलं. यापूर्वी ती राहुल महाजनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पायलने राहुलवर मारहाणीचे आरोप केले होते. राहुलने डिंपी गांगुलीशी लग्न केलं, पण त्यांच्यातही बिनसल्याचे वृत्त आले. डिंपीनेही राहुलवर हिंसाचाराचे आरोप केले होते. पायलने तिच्या व्लॉगमध्ये वैयक्तिक आयुष्यातील समस्या दाखवून प्रसिद्धी मिळवली. ती शेवटची 'लॉक अप' शोमध्ये फर्स्ट रनर अप होती.