काय करतो अंकिता वालावलकरचा होणारा पती? जाणून घ्या
कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर लवकरच संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्न करणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात चौथी रनर अप राहिलेल्या अंकिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून कुणालचे नाव जाहीर केले. दोघांनी 'आनंदवारी' गाण्यात एकत्र काम केले आहे. अंकिता आणि कुणाल फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्न करणार आहेत.