Video: सातारच्या जिनिलीयाला पाहिलंत का? जबरदस्त उखाणा घेऊन रितेश देशमुखबरोबर केला डान्स
‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ८ मार्चला रात्री ७ वाजता हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे. यंदा ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यातील सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघने सांभाळली आहे. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सातारच्या जिनिलीयाचा व्हिडीओ.