Video: “परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका”, पारूने अनुष्काला दिली ताकीद, म्हणाली…
‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेला 'पारू' मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये, अनुष्का पारूला म्हणते, “जा तुझ्या देवी आईला दिशा आणि माझं सत्य जाऊन सांग आणि त्यानंतर माहितीये ना तुला.” यावेळी अनुष्का पारूच्या मंगळसूत्राला हात लावते. त्यामुळे पारू अनुष्काचा हात पकडून म्हणते, “माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. अनुष्का मॅडम एक लक्षात ठेवा, या परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही डाव जिंकलात आणि खेळीपण तुम्हीच केलात. आता बारी आहे पारूची.”