Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं भिवंडीत लोकार्पण; कसं आहे हे मंदिर?
भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पहिल्या शिव मंदिराचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या मंदिरात शिवाजी महाराजांची साडेसहा फूट उंचीची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. किल्ल्याच्या रचनेप्रमाणे उभारलेल्या या मंदिरासाठी ७-८ कोटी रुपये खर्च झाले असून, मंदिराभोवती तटबंदी, बुरूज आणि महाद्वार आहे. मंदिराच्या खांबांवर कोरीव नक्षीकाम आहे.