बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले, “त्या मुलींना…”
बदलापूरमधील आदर्श शाळेत अक्षय शिंदे या कर्मचाऱ्याने तीन वर्षांच्या दोन मुलींचं लैंगिक शोषण केल्याने संतप्त नागरिकांनी रेलरोको आंदोलन केलं. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पीडित मुलींना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्यांनी मुलींच्या घरी कुणाला न जाऊ देण्याचं आणि त्यांना मानसिक आधार देण्यास सांगितलं. राज ठाकरे २६ तारखेला बदलापूरला भेट देणार आहेत.