ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसेचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकल्या
ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाने आयोजित केलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना मनसे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर शेण व बांगड्या फेकल्या, तसेच एका कारची काच फोडली. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा गोंधळ थांबवला.