रेसॉर्टमध्ये १५८ बॅरल मानवी मैला सोडून दाम्पत्य फरार;इकोफ्रेंडली आयुष्याचा केला होता दावा!
पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर, पर्यावरणपूरक रिसॉर्ट चालवणाऱ्या डेन्मार्कच्या फ्लेमिंग हॅन्सन व मेट हेलबीक या दाम्पत्याने १५८ बॅरल्स मानवी मैला मागे सोडून ग्वाटेमालाला पलायन केल्याचे उघड झाले आहे. स्वीडनमध्ये दिवाळखोरी व कर थकबाकीमुळे ते फरार झाले. त्यांनी ग्वाटेमालामध्ये नवीन हॉटेल सुरू केले असून, डेन्मार्क व स्वीडन प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत.