Video: महिला अधिकाऱ्याची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कॅमेऱ्यात सगळा प्रकार कैद!
उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात औषध निरीक्षक निधी पांडे यांचा एका औषध दुकानात लाच मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी दुकानदाराला परवाना रद्द करण्याची धमकी देत भरमसाठ रक्कम मागितली. या घटनेनंतर विभागाने तातडीने कारवाई करत निधी पांडे यांचे निलंबन केले. परिसरातील औषध विक्रेत्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.