एलॉन मस्क आता ‘एलॉन मस्क’ नाही! एक्स प्रोफाईलवर नाव बदललं, आता ‘हे’ आहे नवीन नाव!
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्सवरील प्रोफाईलचं नाव बदलून Kekius Maximus ठेवलं आहे. हे नाव क्रिप्टोकरन्सीशी संबंधित आहे. मस्क हे क्रिप्टोकरन्सीचे मोठे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी अनेकदा याचा पुरस्कार केला आहे. Kekius Maximus नाव एका मीमवरून आले असून, सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मस्क यांनी हे नाव निवडल्याचं मानलं जातं.