पर्सनल लोनच्या मागणीत वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज?
Personal Loans : देशात सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असते. हल्ली लोकं विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी लोनचा पर्याय निवडताना दिसतात. मोबाइल, घरातील लहान-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अनेक गोष्टी लोनवर खरेदी करतात. इतकंच नाही तर आता अनेक ऑनलाइन वेबसाइटवर महागडे कपडेही इएमआयवर खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जातो. यांसारख्या अनेक कारणांमुळे आता गूगल ट्रेंड्सवरही पसर्नल लोन कीवर्ड ट्रेंड होताना दिसतोय.