Video: पाकिस्तानमध्ये हिट अँड रन; बड्या उद्योगपतीच्या मुलीला पीडित कुटुंबानं केलं माफ!
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हिट अँड रन प्रकरणांची चर्चा झाली. मुंबईत एका श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने बाईकवर जाणाऱ्या पती-पत्नीला धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला. पाकिस्तानातही अशीच घटना घडली. नताशा दानिशने एसयूव्हीने बापलेकीला धडक दिली, ज्यात दोघांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांनी तिला माफ केल्याने आता टीका होत आहे. नताशाला मानसिक आजार असल्याचा दावा करण्यात आला असून आणि तिला जामीन मंजूर झाला आहे.