कर्मचाऱ्यांना मद्यही मिळतं अन् हँगओव्हरसाठी सुट्टीही; या कंपनीनं दिली भन्नाट ऑफर
जपानमधील एका टेक कंपनीने कमी पगारात प्रतिभावान कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अनोखी योजना आखली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना मोफत दारू देण्याची आणि हँगओव्हरसाठी रजा मंजूर करण्याची योजना सुरू केली आहे. कंपनीचे सीईओ वैयक्तिकरित्या मद्य पुरवतात आणि कर्मचाऱ्यांसोबत पेये शेअर करतात. यामुळे कामाचे वातावरण उत्साही बनते आणि कर्मचाऱ्यांची कामाची क्षमता वाढते. आर्थिक अडचणींमुळे जास्त पगार देणे शक्य नसल्याने हे फायदे दिले जातात.