“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी”, काश्मिरी गायिका शमीमा अख्तर यांचं गाणं, Video व्हायरल!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं अधिवेशन दिल्लीत होत आहे. 'सरहद' संस्थेच्या माध्यमातून ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे. काश्मिरी गायिका शमीमा अख्तर यांनी 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' हे गाणं गायलं आहे. त्यांच्या बहुभाषिक गायनामुळे त्या चर्चेत आहेत. ७१ वर्षांनंतर दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचं ऐतिहासिक महत्त्व आहे.