“तमिलनाडू कैसा पहुँचेगा भाई?” कुणाल कामराच्या फोनकॉलची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल!
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या 'नया भारत' शोमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या गटावर केलेल्या विडंबनपर गाण्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाने संताप व्यक्त केला असून, हॅबिटॅट क्लबच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात शिवसेना कार्यकर्त्याचा फोन कॉल आहे. कामराने माफी मागण्यास नकार दिला असून, आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र शेअर केले आहे.