“बायको स्वप्नात येऊन माझं रक्त…”, कामावर रोज उशीर होत असल्याबाबत जवानानं दिलं अजब कारण
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे निमलष्करी सशस्त्र पोलीस दलातील शिपायाला शिस्तभंगाची नोटीस मिळाली. कामावर उशीर येण्याचे कारण विचारल्यावर शिपायाने सांगितले की, पत्नी स्वप्नात येऊन त्याचे रक्त पिते, त्यामुळे तो झोपू शकत नाही आणि कामात लक्ष लागत नाही. हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून वरिष्ठ अधिकारीही हैराण झाले आहेत.