१९८३च्या वर्ल्डकपमधली सर्वात अविस्मरणीय गोष्ट कुठली असेल तर ती कपिल देव यांची नाबाद १७५ धावांची खेळी. भारती एअरटेलनं हीच खेळी अव्वल दर्जाच्या ५जी नेटवर्क तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुन्हा एकदा चाहत्यांसाठी उभी केली आहे. हा वर्ल्डकप जिंकून भारतानं इतिहास घडवला हे खरंच आहे. पण भारताच्या क्रिकेट इतिहासात या स्पर्धेत कपिल देव यांनी जिम्बाब्वेविरुद्ध केलेली खेळी भारतासाठी अविस्मरणीय ठरली. पण ही खेळी इतिहासजमा झाली असंच म्हणावं लागेल. कारण मॅचच्या दिवशीच नेमका टीव्ही तंत्रज्ञांच्या संघटनेचा संप होता. त्यामुळे सामना टेलिकास्ट होऊच शकला नाही. पण ती इतिहासजमा खेळी आता तशी राहणार नाही!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या भारती एअरटेलनं उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान वापरून ‘१७५ रिप्लेड’ या व्हिडीओच्या माध्यमातून त्या सामन्यातले महत्त्वाचे क्षण पुन्हा जिवंत केले आहेत. जवळपास ५० युजर्सला ५जी स्मार्टफोन्सच्या साहाय्याने 4K तंत्रज्ञान वापरून या सामन्यातील महत्त्वाचे क्षण पुन्हा जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. एअरटेलच्या ५जी टेस्ट नेटवर्कवर १ जीबी प्रतिसेकंद आणि ३० मिलिसेकंदाहून कमी तफावत असणारा व्हिडीओ अनुभव या युजर्सला देण्यात आला. यातून युजर्सला मैदानाच्या सर्व बाजूंनी अर्थात ३६० अंशातून सामन्यातील हे क्षण पाहता आले. शिवाय, शॉट्सची आकडेवारी, परीक्षण या गोष्टींमुळे युजर्सच्या आनंदात अजूनच भर पडली.

यासंदर्भात बोलताना भारती एअरटेलचे सीटीओ रणदीप सेखॉन म्हणाले, “यातून मिळणारा गिगाबाईट्सचा वेग आणि ५जीची मिलिसेकंदांहून कमी असणारी तफावत यामुळे युजर्सची मनोरंजनाची पद्धतच पूर्णपणे बदलून जाणार आहे. आज आम्ही केलेल्या प्रात्याक्षिकामुळे आम्ही ५जी तंत्रज्ञान आणि डिजिटल विश्वातल्या अमर्यादित शक्यतांना फक्त स्पर्श केला आहे.”

यासोबत न भूतो न भविष्यती अशी अजून एक गोष्ट यासोबत घडली आहे. पहिल्यांदाच एअरटेल ५जी तंत्रज्ञानावर आधारित खुद्द कपिल देव यांचा हॉलोग्राम तयार करण्यात आला, ज्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि क्रिकेटचाहत्यांसाठी त्या सामन्यातील महत्त्वाच्या क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

याविषयी बोलताना स्वत: कपिल देव सांगतात, “५जी तंत्रज्ञानाची ताकद आणि थेट चाहत्यांशी संवाद साधणारा माझा डिजिटल अवतार पाहून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला आहे. जणूकाही मी स्वत: तिथे हजर होतो. एअरटेलनं केलेल्या या अभिनव उपक्रमासाठी मी त्यांचे आभार मानतो. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या खेळीला त्यांनी पुन्हा एकदा जिवंत केलं.”

रणदीप सेखॉन पुढे बोलताना म्हणाले, “५जी तंत्रज्ञानावर आधारीत हॉलोग्राम्समुळे आपण व्हर्च्युअल अवतार कोणत्याही ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. यामुळे बैठका, कॉन्फरन्स, लाईव्ह बातम्या आणि इतर अनेक बाबतीत मोठे फेरबदल झालेले दिसून येणार आहेत. या बदलत्या डिजिटल विश्वात एअरटेल ५जी तंत्रज्ञानासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतात या सेवेसाठी सक्षम संरचना एअरटेलकडून उभारली जात आहे. या निमित्ताने आम्ही दूरसंचार विभागाचे देखील आभार मानतो. त्यांनी आम्हाला ट्रायल स्पेक्ट्रम उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे आम्ही आमचं तंत्रज्ञान त्यावर तपासून पाहू शकलो.”

हे प्रात्याक्षिक एअरटेलच्या मानेसर-गुरग्राममधील नेटवर्क एक्सपिरियन्स सेंटरमध्ये करण्यात आलं. यासाठी एनएसए मोडमध्ये ५जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या टेलिकॉम विभागाकडून यासाठी ३५०० MHz बँड टेस्ट स्पेक्ट्रम उपलब्ध करून देण्यात आलं होतं. यातून ही बाब स्पष्ट झाली की ५जी तंत्रज्ञान येणाऱ्या भविष्यकाळात व्हिडिओ एंटरटेन्मेंटचा चेहरामोहरा कशा पद्धतीने बदलू शकतं. याशिवाय एकदा का एअरटेलचं ५जी नेटवर्क बाजारात उपलब्ध झालं, की ते किती सक्षमपणे काम करू शकेल, याचा देखील अंदाज यातून आला.

गेल्या वर्षभरात एअरटेलनं केलेल्या ५जी तंत्रज्ञानाच्या चाचण्यांपैकी ही सर्वात नवीन चाचणी आहे. या तंत्रज्ञानाला अधिकाधिक स्वीकृती मिळावी यासाठी कंपनीने देशभरात अनेक ठिकाणी अशा प्रकारची प्रात्याक्षिके केली आहेत. गेल्या वर्षी कंपनीने लाईव्ह एअरटेल नेटवर्कवर क्लाऊड गेमिंगचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. ५जीफॉरबिझनेस या उपक्रमाची सुरुवात देखील केली. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी ५जी तंत्रज्ञानावर आधारीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी एअरटेलनं इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित कंपन्यांसोबत देखील प्रयत्न सुरू केले आहेत.

Disclaimer: 5G Demo based on trial spectrum given by Department of Telecom.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharti airtel video entertainment on 5g recreates kapil dev 175 not out inning pmw