गेल्या दोन वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या उलथापालथींसोबतच अवघ्या जगामध्ये करोनाच्या साथीमुळे प्रचंड बदल पाहायला मिळाले. फायनान्शिअल टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या सर्वच देशांमध्ये स्टार्टअप्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. औपचारिक क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी आवश्यक मनुष्यबळाकडून असणाऱ्या कौशल्यविषयक अपेक्षांमध्ये देखील मोठा बदल होऊ लागला आहे. नवउद्योगांमध्ये देखील हा बदल जाणवू लागला आहे. कल्पकता, नव्या संकल्पना आणि क्रिटिकल थिंकिंग या बाबी सध्याच्या घडीला महत्त्वाच्या मानल्या जातात. आजच्या नवोदित व्यवस्थापकांना आत्मविश्वासाने आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज करण्यावर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पण या मोठ्या संधीमध्ये एक अडचण आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे योग्य प्रकारची मानसिकता आणि आवश्यक ती कौशल्य नसतील, तर नवउद्योजकता हा एक खडतर मार्ग ठरू शकतो. त्यामुळेच आजच्या युगात तरुणांमध्ये उद्योजकतेची भावना जागृत करणं ही शैक्षणिक संस्थांची मूलभूत जबाबदारी बनली आहे.

tasgaon kavathe mahankal assembly constituency rohit patil vs sanjay kaka patil maharashtra assembly elections 2024
लक्षवेधी लढत : दोन पाटलांमधील लढतीत कोणाची बाजी?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती

इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण नक्की कुणाला नवउद्योजक समजतो? कदाचित या प्रश्नावर डोळ्यांसमोर पहिली आकृती उभी राहाते ती म्हणजे एक हुशार, सुटाबुटातला, भन्नाट संवाद कौशल्य असणारा, उच्चभ्रू काचेच्या इमारतीत गुंतवणूकदारांसमोर त्याच्या कल्पना मांडण्यासाठी सज्ज असणारा तरुण! पण आपण असं म्हणू शकतो का की एखादा ग्रामीण भागातला शेतकरी, जो आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वदेशी कल्पनांच्या मदतीने आपलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो, तो अशा नव उद्योजकांपेक्षा कुठेही कमी आहे? बहुतेक वेळा आपण त्याच्या उद्योजक वृत्तीपेक्षाही दिखाव्याच्याच आहारी जाऊन पारखू लागतो.

ims gaziabad
आयएमएस गाझियाबाद!

नवउद्योजकता ही एक विचार करण्याची पद्धती आहे. एक मानसिकता आहे. बदल होण्याची वाट पाहाण्यापेक्षा स्वत:हून बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याची वृत्ती आहे. नवीनतम गोष्टींचा स्वीकार करणारा, गंभीर प्रश्नांचा, समस्या ओळखण्याचा आणि त्यावर व्यवहार्य उपाय शोधण्याचा हा दृष्टीकोन आहे. नेहमी व्यापक चित्र डोळ्यांसमोर ठेवणे, सजग आणि चपळ राहाणे, भूतकाळात मिळालेल्या यशामुळे भारावून न जाऊन आत्ममग्न होण्याऐवजी नवनव्या संधींचा सोध घेण्याचा हा दृष्टीकोन आहे. यामध्ये सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन जोखीम घेणं महत्त्वाचं असतं. ज्यात तुम्ही कधी यशस्वी होता, कधी अपयशी होता. सखोल विचार करणाऱ्या संस्था नेहमीच अशा कर्मचाऱ्यांच्या शोधात असतात, ज्यांच्यात नवउद्योजकतेचं स्पिरीट असेल, जे नव्या क्षितिजांची स्वप्न पाहात असतात आणि त्याचवेळी ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं धैर्य आणि दृढ निश्चय बाळगून असतात.

जवळपास ६० टक्के लोकसंख्या ही काम करणाऱ्या गटातली असणाऱ्या भारतासारख्या देशात उत्साही आणि सतत नवनव्या शोधांसाठी प्रयत्न करणाऱ्या नवउद्योजकांची नितांत गरज आहे. पण जर भारतातील तरुणांमध्ये आवश्यक असणारी नवउद्योजक कौशल्य आणि स्पिरीट नसेल, तर त्यातून फार उत्पादक गोष्टी घडण्याची शक्यता कमी होत जाते. दुर्दैवाने सध्या देशातील शिक्षण संस्था या नोकऱ्या तयार करणाऱ्यांपेक्षा नोकऱ्यांच्या शोधात असणारे तरुण तयार करत आहेत.

सध्याच्या व्यावसायिक वातावरणामध्ये यशस्वीरीत्या मार्गक्रमण करण्यासाठी तरुणांना अत्याधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करणं आवश्यक आहे. आयएमएस गाझियाबाद गेल्या ३२ वर्षांपासून याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनोख्या कल्पनांवर काम करणं सुलभ व्हावं यासाठी संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

संस्थेमध्ये संशोधनाच्या वृत्तीचं संवर्धन केलं जावं, यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहेत. यापैकी एक म्हणजे सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड ऑन्त्रप्रुनरशिप (CIE). भारतातील संशोधक वृत्ती शोधून ती समोर आणणं हे नवउद्योजकतेतूनच शक्य होऊ शकेल, या सूत्रावर हा उपक्रम आधारित आहे. आयएमएस गाझियाबादमध्ये भारतातील नवउद्योजकतेला वाव देणाऱ्या वातावरणाचं संवर्धन करण्यावर भर दिला जातो. यासाठी या संपूर्ण वातावरणातील प्रमुख घटक असणारे विद्यार्थी, उद्योजक, इच्छुक आणि विद्यमान नवउद्योजक, मार्गदर्शक, गुंतवणूकदार, भांडवली कंपन्या आणि कॉर्पोरेट्स यांच्यामध्ये सहज सुलभ आणि प्रभावी संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न या संस्थेत केला जातो. यासाठी संवाद सत्र, स्पर्धा, परिषदा अशा उपक्रमांचं आयोजन केलं जातं.

विद्यार्थी, प्राध्यापक आणि तज्ज्ञांचा समावेश असलेल्या आयएमएस गाझियाबादमझील सीआयई मोहिमेचा उद्देश हा तरुणांना त्यांच्या कल्पनेतील यशस्वी व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांच्यातील नवउद्योजकता आणि संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देणे हा आहे. नवउद्योजकांना त्यांच्या स्टार्टअप्सवर काम करून मोठा, फायदेशीर आणि शास्वत व्यवसाय उभारण्यासाठी एक केंद्र उभारण्याचं देखील नियोजन सुरू आहे.

कॉर्पोरेट डेव्हलपमेंट अँड एक्सलन्स सेंटर (CDEC) हा आयएमएस गाझियाबादचा महत्त्वाचा प्रशिक्षण आणि समुपदेशन उपक्रम आहे. यातून इतर संस्थांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि समुपदेशन देण्याचा यामागे उद्देश आहे. आम्ही नुकतेच ‘पीआर टू पीआर मेंटॉरिंग सत्र’ देखील सुरू केले आहेत. दिल्ली विद्यापीठाची यासाठी मदत घेण्यात आली आहे. यामध्ये आयएमएस गाझियाबादचे विद्यार्थी त्यांच्या सहकाऱ्यांना प्रशिक्षण देतील. सहयोगी तत्वावर राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे दोन्ही सहभागी संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि शिक्षणाला चालना मिळू शकेल.

आयएमएस गाझियाबादमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायातील त्यांचं कौशल्य, स्पर्धात्मक आढावा आणि शाश्वत प्रगती साध्य करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये गेस्ट लेक्चर्स, परिसंवाद, पॅनल डिस्कशन, कार्यशाळा, सर्वेक्षणे आणि संशोधनविषयक उपक्रम नियमितपणे राबवले जातात. जेणेकरून कॉर्पोरेट विश्वातील तज्ज्ञ, भाडवलदार, नवउद्योजकांसोबत चर्चा आणि विचारांचं आदान-प्रदान करणं शक्य होऊ शकेल. यातून कल्पक उत्पादने आणि सेवा विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल.

उच्च शैक्षणिक संस्थांनी पारंपारिक पठण प्रक्रियेवर आधारित शिक्षणापासून दूर जाऊन स्वतंत्र विचार, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देणाऱ्या शिक्षण प्रणालीकडे जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. आयएमएस गाझियाबाद विद्यार्थ्यांमध्ये आजीवन शिकण्याच्या क्षमता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. नव्या युगातील नवउद्योजक आणि नेतृत्व घडवण्यासाठी आयएमएस गाझियाबाद कटिबद्ध आहे. हे नवीन उद्योजक भविष्याचा वेध घेणे, मोठी स्वप्न पाहाणे आणि त्याचवेळी सहानुभूती, कृतज्ञता आणि नम्रता या मानवी गुणांनी सज्ज असतील यात कोणतीही शंका नाही!