कापूस उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचा इतिहास समृद्ध आहे ह्या प्रवासात कस्तुरी कॉटन हे एक नवीन यश आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार, वस्त्रोद्योग व्यापार मंडळे आणि उद्योग यांचा हा संयुक्त उपक्रम देशातील सर्वोत्तम कापूस जगासमोर सादर करत आहे. कस्तुरी कॉटनच्या माध्यमातून शेतकरी, जिनर्स, स्पिनर्स, उत्पादक आणि ब्रँड अशा सर्व संबंधितांचा फायदा करून देणे आणि अशा प्रकारे शाश्वत व वैभवशाली पर्यावरण यंत्रणेला चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
कस्तुरी कॉटनचे प्रमाणिकरण, ट्रेसेबिलिटी आणि ब्रँडिंग यावर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय), यांच्या सहयोगाने द कॉटन टेक्स्टाईल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसिल) द्वारे देखरेख ठेवली जाते आणि त्यातून अस्सलता व विश्वासार्हता यांची काळजी घेतली जाते.
कस्तुरी कॉटन द्वारे सर्वोत्तम दर्जाच्या कापसाचा विश्वास दिला जातो आणि अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण ट्रेसेबिलिटीची काळजी घेतली जाते. यामुळे संपूर्ण पुरवठा श्रृंखलेतील सर्व ग्राहक व खरेदीदार यांना पारदर्शकता आणि अस्सलपणा मिळतो. नोंदणीच्या अगदी सरळ आणि सुलभ पद्धतीमुळे सर्व संबंधितांना कस्तुरी कॉटन कार्यक्रमात चटकन सहभागी होता येते आणि त्याचे फायदे घेता येतात.
कस्तुरी कॉटन कार्यक्रमात सहभागी होऊन, कापूस पुरवठा श्रृंखलेतील सहभागी भारतीय कापसाचा प्रचार आणि प्रगती यात सक्रिय योगदान देऊ शकतात आणि भारतीय कापूस सर्वोत्तमतेत अधिक वाढ करण्याची बांधिलकी जपून त्याचवेळी आपल्या परताव्यात देखील वाढ करू शकतात.
कस्तुरी कॉटनसंबंधी अधिक माहितीसाठी www.kasturicotton.com येथे भेट द्या!