शॉपिंग हा तरूणांचा जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं जातं. परंतु असं अजिबात नाही. ‘शॉपिंग’हा अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंतचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पण अलीकडे शॉपिंगची व्याख्या मात्र बदलत चाललीय. ‘मॉल शॉपिंग’ हा शॉपिंग संस्कृतीच्या प्रगतीचा पहिला टप्पा. अद्ययावत शॉपिंगचा पुढील टप्पा म्हणजे-‘ऑनलाईन शॉपिंग’!!
तरूण मुलं विशेषत: सीडी, पुस्तकांची खरेदी करण्यासाठी या मार्गाचा अधिक वापर करतात. भारतीय वस्तूंची ऑनलाईन ग्राहकपेठ म्हणजेच ‘शोपो.इन’(www.shopo.in) ही वेबसाईट अस्तित्वात आली आहे. अवघ्या काही दिवसांतच भारतीयांमध्ये ऑनलाईन शॉपिंग’ची ही वेबसाईट अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
दागिने, भित्तीचित्रे, डायरी, शुभेच्छापत्रे, फोटो फ्रेम, खेळ, घड्याळ, बॅग्स्, पुस्तकं, कॉम्प्युटर आणि पर्सनल अॅक्सेसरीज, किचन अॅक्सेसरीज अशा साधारण ५० प्रकारच्या विविध वस्तू या वेबसाईटद्वारे आपण खरेदी करू शकतो. या सर्व वस्तू भारतीय कलाकुसरीपासून बनविण्यात आल्या आहेत. तसेच अनेकविध ‘इको-फ्रेण्डली’ वस्तू या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या वेबसाईटचे सदस्यत्व निशुल्क आहे. तसेच ३ ते५ दिवसांच्या आत आपण ऑर्डर केलेली वस्तू घरपोच पोहचते.
http://www.jabong.com ही वेबसाईट अलिकडे तरूणांमध्ये फार लोकप्रिय आहे. या वेबसाईटवर असणाऱ्या वस्तूंवर क्लिक केल्यावर या वस्तू घरी येतात. यामध्ये शूज, फर्निचर, पर्सेस, शर्टस् अशा विविध वस्तू आपल्याला पाहायला मिळतील. घरबसल्या आपल्याला हव्या त्या वस्तूवर क्लिक करून तिची डिलीव्हरी आपल्याला किमान पाच दिवसात घरी मिळेल असा दावाही या कंपनीने केला आहे. सध्या तरूणाईच्या दृष्टीने हा वेबकट्टा खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. मुख्य म्हणजे या वेबकट्टय़ावरील शॉपिंगही रिझनेबल आहे.
http://www.fashionandyou.com ही वेबसाईटही तितकीच उत्तम आहे. सध्या या साईटच्या माध्यमातून खास फेस्टिव्ह सीझन डोळ्यासमोर ठेवून साडय़ा आणि एथनिक वेअर आणलेलं आहे. यावर काही टक्के सूटही देण्यात येत आहे. शिवाय सेलचा पर्यायही आपल्याला उपलब्ध आहे. लग्नाकार्यासाठी असलेले कपडेही या साईटवर उपलब्ध आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतसाठी वेळ देता येत नाही. मग शॉपिंग करण्यासाठी वेळ काय आणि कसा देणार असा प्रश्न पडलेल्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग हा बेस्ट पर्याय आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2012 रोजी प्रकाशित
शॉप इट..
शॉपिंग हा तरूणांचा जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं जातं. परंतु असं अजिबात नाही. ‘शॉपिंग’हा अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंतचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पण अलीकडे शॉपिंगची व्याख्या मात्र बदलत चाललीय. ‘

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-11-2012 at 10:26 IST
मराठीतील सर्व Style इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Style it