सण हे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते खूप बदलले आहेत, हे वाक्य आपल्याला सतत ऐकायला मिळतं. काळ बदलला त्याबरोबर माणसाच्या जगण्याच्या व्याख्याही बदलल्या. मग त्यात सणही बदलणारच ना.. आता हेच बघा ना गणपती यायला अवघे तीन दिवस राहिल्यावर बाप्पांची सजावट कशी आणि काय करायची हा प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८) आपल्या सर्वानाच पडलेला आहे. दुकानात असलेल्या रेडिमेड मखरांकडे नजर वळत आहे. आपल्या बाप्पांची उंची किती, आकार किती, हे सर्व पाहून रेडिमेड मखर घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. पण याच जोडीला बाप्पांचा साजही तितकाच महत्त्वाचा आहे. बाजारात आपल्याला बाप्पांसाठी अनेक दागिने दिसून येतील. यातील काही दागिने तर खरोखरीच आपलं लक्ष वेधून घेतात. बाप्पांच्या दागिन्यांचा शोध घेताना अनेक गोष्टी नजरेसमोर येऊ लागल्यात त्या म्हणजे केवळ चांदीचेच दागिने नाहीत, तर आता सोन्याच्या पाण्याचा वापर करूनही दागिने घडवले जात आहेत. त्यामुळे भक्तांना अधिक ऑप्शन्सही उपलब्ध झाले आहेत.
काळ बदलला तसे बाप्पांच्या दागिन्यांमध्येही बराच फरक पडलेला दिसून येतो. अलीकडे मूर्ती बनवताना त्यावर दागिने घालण्यासाठी जागा असावी याचाच विचार केला जातोय. त्यामुळेच खास गणपतीच्या दागिन्यांनाही डिमांड वाढत आहे.
सोंडपट्टी, भिकबाळी, मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुर्वाचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जान्हवं, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टॅंड, फुलपरडी, नंदादीप
तारा ज्वेलर्सचे बाप्पा कलेक्शन
गणपती हा कुठल्याही रूपात आपल्याला भावतो. खास तारा ज्वेलर्सने हेच लक्षात ठेवून आपल्यासाठी गणपतीचे काही खास कलेक्शन आणलेले आहे. तुम्हाला आवडतील अशाच आकारातील चांदी आणि सोन्याचं पाणी दिलेल्या विविध आकारातील मूर्ती आणल्या आहेत. या नाजूक अशा मूर्ती देव्हाऱ्यातही ठेवता येतील अशाच आहेत.
बाप्पासाठी पेठे यांच्याकडे बाप्पाचं उपरणं, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळं, कान, भिकबाळी, उंदीर, परशू असे नानाविध प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतील.
गणपतीचे पेंडंट हा अनेकांचा वीकपॉइंट. म्हणूनच खास पॉपलेने आता गणपतीच्या सणाच्या निमित्ताने नवनवीन पेंडंटस् बाजारात आणली आहेत. यामध्ये चांदी आणि सोन्याची विविध पेंडंटस् आपलं लक्ष वेधून घेतील अशीच आहेत. केवळ पेंडंटस् नाहीत तर यामध्ये बाप्पाच्या वैविध्यपूर्ण मूर्तीचाही समावेश आहे. त्यामुळे हे कलेक्शन बाप्पाच्या सजावटीसाठी नक्कीच उत्तम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा