भारतीय खेळाडूंवर बऱ्याच वेळा टीका करणाऱ्या इयान चॅपेल यांनी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर स्तुतिसुमने उधळून आश्चर्याचा धक्का दिला आहे. धोनीने कर्णधार म्हणून आणखी खेळत राहावे, अशा शब्दांत त्यांनी धोनीचे कौतुक केले.
‘‘ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार व खेळाडू या दोन्ही भूमिका धोनीने यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. तो जरी कसोटी सामन्यांसाठी योग्य कर्णधार नसला तरी ट्वेन्टी-२० सामन्यांकरिता तो अतिशय हुकमी कर्णधार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने केलेल्या १९२ धावा काही कमी नव्हत्या. दुर्दैवाने त्या धावसंख्येला साजेशी गोलंदाजी भारताकडून झाली नाही,
यामध्ये धोनीचा दोष नाही,’’ असे ते म्हणाले.

भारतीय संघाकडून मूलभूत चुका -वॉर्न
मुंबई : क्रिकेटच्या खेळातील अगदी मूलभूत गोष्टींमध्येच भारतीय संघाने चुका केल्या आणि याचा त्यांना
फटका बसला असे परखड मत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने व्यक्त केले.
तो म्हणाला, ‘‘भारत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे असे माझे मत होते. मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी मूलभूत गोष्टींचे पालन केले नाही. यात भर म्हणून दोन नोबॉल आणि दवामुळे पराभव झाला.’’

Story img Loader